Episodes

  • # 1798: प्रतापचा प्रताप. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jul 1 2025

    Send us a text

    तो त्याच्या मित्रांकडून आणि कार्यालयांकडून आणि म्हैसूरमधील इलेक्ट्रॉनिक कंपन्यांमध्ये जाऊन ई-कचरा म्हणून कीबोर्ड, माऊस, मदरबोर्ड आणि इतर संगणक उपकरणे गोळा करत असे आणि त्यावर संशोधन करत असे. आणि त्यातून ड्रोन बनवण्याचा प्रयत्न करत असे.
    तो दिवसा अभ्यास करत असे आणि काम करत असे आणि रात्री प्रयोग करत असे.
    सुमारे ८० प्रयत्नांनंतर, त्याने बनवलेला ड्रोन हवेत उडाला त्यावेळी तो तासभर आनंदाने रडला.
    ड्रोनच्या यशाची बातमी कळताच तो त्याच्या मित्रांमध्ये हिरो बनला.

    Show more Show less
    7 mins
  • # 1796: अरण्यऋषी मारुती चितमपल्ली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jun 30 2025

    Send us a text

    गावाभोवती चिंचेची झाडं का लावली पाहिजेत... याचं वैज्ञानिक कारण मारुती चित्तमपल्ली अतिशय आत्मीयतेने सांगत...चिंचेच्या झाडात विलक्षण अशी अर्थिंग क्षमता असते... पावसाळ्यात गावात विजा पडू नयेत म्हणून गावाभोवती चिंचेची झाडं लावावीत...जोपासावीत..वादळ- वा-यात विजा कडाडल्या तर चिंचेखाली उभं राहू नये...कारण हे झाड विजेला खेचून जमिनीत घेऊन जातं...! हे सारं त्यांच्या मुखातून ऐकताना श्रोते चकित होऊन जात.

    Show more Show less
    15 mins
  • # 1795: "तुळशीबाईशी हितगुज" लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jun 28 2025

    Send us a text

    "बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल" असा गजर झाला आणि सखुनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतल.म्हणाली, "तुळशीबाई चला निघुया वारीला...."

    वारीचा तो अनुपम सोहळा किती बघु आणि किती नको अस तुळशीला होऊन जायच..

    तिच्या कडे पाहत बाया जाता जाता म्हणत असलेलं कानी पडायचं.

    "तुळसा बाईचा हिरवा हिरवा पाला ग l

    कसा बाई तिने गोविंद वश केला ग ll"

    Show more Show less
    6 mins
  • # 1794: "बोलणारे देव." लेखक : केदार अनंत साखरदंडे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jun 27 2025

    Send us a text

    "का कुणास ठाऊक पण आजी देवांबरोबर बोलायची." रांगत्या बाळकृष्णला म्हणायची "अरे थांब थांब पळू नकोस आंघोळीच्या नावाने असा. तुला आंघोळ चुकायची नाही त्याने. मी मेली म्हातारी कुठं पर्यंत येइल तुझ्या मागे असं तुला वाटेल ,पण मी येईन हो पार गोकुळ मथुरे पर्यंत."

    एक दिवस आजी देवांशी प्रत्यक्ष संवाद साधायला निघून गेली इथे देव्हाऱ्यातले देवघरातले देव कायम चे निशब्द झाले!

    Show more Show less
    3 mins
  • # 1793: हेच खरं आयुष्याचं गणित. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jun 26 2025

    Send us a text

    आई-बापानं ४०० रुपये हातावर ठेवले.
    "हे घे. पण बघ, चांगले हापूसच घ्यायचे. आणि तुझे-तुझे पैसै वाचवून घ्यायचे. व्यवहार शिक. भाव करायला शीक." असं म्हणून पाठवलं.
    पोरगं धडपडलं.
    कधी एका गाड्यावर, कधी दुसऱ्या दुकानात. पण कोणीच ४०० च्या खाली एक डझन आंबे द्यायला तयार नव्हतं. कोणी म्हणे ५००, कोणी ४८०.
    डोळ्यात थोडं नाराजीनं पाणी आलं.
    पण मागे फिरणार नव्हता.
    आईचं बोलणं आठवत होतं, "हुशारी म्हणजे फक्त पुस्तकात नाही, व्यवहारात पण शहाणपण लागतं."

    Show more Show less
    7 mins
  • # 1792: श्रीनिवास पानसे च आंगण लेखिका - वसुधा पाटील कथन - ( मृदुला जोशी )
    Jun 25 2025

    Send us a text

    मला नेहमीच नाचावसं वाटतं , आषाढाच्या सरीवर सरी पडू लागल्या की मला नाचावसं वाटतं ओट्यावरच्या पत्र्यावर पावसाचे थेंब पडू लागले आणि ताशा वाजू लागला की मला नाचावसं वाटतं ,अंगणात पाऊलभर पाणी साचलं की अगदी ओरडत ओरडत त्यात नाचावसं वाटतं पण आई मला तसं करू देत नाही 😒मला थंडी भरून सर्दी होईल असं सारखा तिला वाटत राहतं....

    Show more Show less
    13 mins
  • # 1791: पाचवा कोपरा लेखिका -सुनंदा पाटील कथन - ( मृदुला जोशी )
    Jun 24 2025

    Send us a text

    श्रद्धा ताईंच्या निवृत्तीनंतर सुनेची वाघनखं बाहेर पडली होती. ती दोघंही नोकरीची असल्याने नातू आणि घर ही जबाबदारी ताईंवर आली . बाळाची केअर टेकर , पोळीवाली बाई बंद झाली. वाढत्या वयानंतर नोकरीतून माणूस निवृत्त होतो . पण बाईला संसारातून निवृत्त होताच येत नाही . उलट जबबाबदाऱ्या वाढतच जातात. तरीही त्या सांभाळून , श्रध्दाताई वेळात वेळ काढून आपला लेखनाचा छंद जपत होत्या. नेमकं तेच सुनेला खटकत होतं . लॅपटॉप वर , मोबाईलवर ती त्यांना लिहिण्याची कामच करू देत नसे. " जागरण करू नका, आराम करा "अशी उसनी काळजी दाखवत त्यांचा छंद तिने जवळ जवळ बंदच केला होता. बाहेरचे सर्व कार्यक्रम बंद झाले होते ते एकटं जायचं नाही या कारणास्तव . वरून , या लेखनातून काय पैसा मिळणार आहे का? वाचतं कोण ही मराठी पुस्तकं आजकाल ? हे बोलणं असायचंच .

    Show more Show less
    12 mins